पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत लवासा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी मान्य न करता याचिका नामंजूर केल्याने पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
